लातूर -प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी आपाल्या घरी स्थापित केलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन जलाशयात न करता मनपाच्या संकलन केंद्रांकडे त्या मुर्ती द्याव्यात.सार्वजनिक गणेश मंडळांनी १२ नंबर पाटी येथील खदानीत विसर्जन करावे,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.मुर्ती संकलनासाठी पालिकेकडून ४३० अधिकारी,कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.