पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेल्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका महिलेस गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने वाघोली येथून जेरबंद केले असून याप्रकरणी तिच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निलम बजरंग परदेशी (रा. पेरणे) असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या महिलेचे नाव आहे. १६ नोव्हेंबर २०२४ पासून एक वर्षासाठी तडीपार केले असताना ती वाघोली येथे मिळून आली.