आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी च्या दरम्यान वसंत नगर येथे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नांदेड शहरातील वसंतनगर येथील निवासस्थानी गणरायाची प्राण प्रतिष्ठापणा करून पूजा अर्चा करण्यात आली. येणारा काळ सुख समृद्धी आणि भरभराटीचा जावा आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आलेले संकट पुन्हा येऊ नये अस साकडं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गणरायाकडे घातलं.मराठा आरक्षणासाठी सरकार संवेदनशील असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले.