श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पवित्र श्री दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्याने,मंदिर परिसरात रात्रीच्या सुमारास पाणी शिरले. परिणामी, मंदिरातील श्री दत्तप्रभूंची उत्सवमूर्ती परंपरेनुसार गुरुवारी दि. 21 ऑगस्ट रात्री साडे अकरा वाजता प.पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांच्या मठात सुरक्षितरित्या हलवण्यात आली.गुरुवारी रात्री सुमारे 9 वाजता कृष्णा-पंचगंगा नदीचे पाणी प पू नारायण स्वामी दत्त मंदिरात शिरले.