"होय..आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो : प्रतिज्ञा करा,तरतूद करा ,सेवा द्या” हे या वर्षाचे घोषवाक्य आहे. दि. 24/03/2025 रोजी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांचे प्रमुख उपस्थितीत जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी tb मुक्त ग्रामपंचायत सरपंचांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह/पदक देऊन गौरवण्यात आले व निबंध रांगोळी, चित्रकला स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.रुग्ण कक्षात फळवाटप करण्यात आले.प्रभातफेरी व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.