रावेर शहरात एचडीएफसी बँक ची शाखा आहे. या बँकेच्या बाहेर पंकज मशाने यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम. एच.१९ सी.एम. ३६६७ ही लावली होती तेव्हा तेथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची ही मोटरसायकल चोरी केली. सदर प्रकार हा निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला. मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही म्हणून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.