शेवटची इच्छा भावाकडे व्यक्त करून भावाला पाठविलेला व्हिडीओ सोमवारी रात्री सर्वत्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.अनं मंगळवार दि.५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा.पारस रेल्वे स्टेशन परिसरात अप साईडला रेल्वे खाली एका तरुणाने येवून आत्महत्या केल्याची घटना घडली. ओळख पटल्या नंतर सदर मृतक व्हिडीओ करणारा तरुणाचाचं असल्याची बाब उघडकीस आली. संघपाल सिद्धार्थ खंडारे वय ३० वर्ष असं या मृतक तरुणाचे नावं आहे.रेल्वे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील कारवाई केली तर नातेवाईकांनी जीआरपी पोलिसांकडे धाव घेतली.