Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आज (दि. २६ ऑगस्ट) दुपारी सुमारास १.३० वाजता दिवसाढवळ्या ८० हजार रुपयांची लूट झाली. हतनूर येथील मिराबाई मनोज ठेंगडे या महिला घर बांधकामासाठी पैसे काढण्यासाठी बँकेत आल्या होत्या. पैसे काढून टेबलावर ठेवले असताना आणि तोंडावर स्कार्फ बांधत असतानाच, अज्ञात चोरट्याने मागून येऊन क्षणातच ८० हजार रुपये, आधारकार्ड आणि पासबुक असलेली बॅग पळवली.चोरटा बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.