लातूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या प्रभाग रचना प्रक्रियेत प्रभाग क्रमांक 3 मधून प्रबुद्ध नगर, महादेव नगर व करीम नगर या भागांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे 2012 च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारे येथील नागरिक यावेळी मताधिकारापासून वंचित राहणार आहेत.