पाचपाखाडी परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गावर पहाटेच्या समारं समोर चालत असलेल्या ट्रेलरला पाठीमागून रिक्षाची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. ट्रेलरला जोरात धडक लागल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला. तसेच रिक्षामध्ये रिक्षा चालक देखील अडकला होता. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्ष,नौपाडा पोलीस,अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि रिक्षा तोडून साहेबराव यादव या रिक्षाचालकाला बाहेर काढून जखमी झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.