दि. 27 जुलै 2025 रोजी श्री उदय सामंत प्रतिष्ठान तर्फे जिल्हा परिषद गट गोळप मधून फणसोप हायस्कूल येथे महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमात जिल्हा परिषद आरोग्य विभाग नेहमीच अग्रेसर असतो.याचाच एक भाग म्हणून फणसोफ येथे 368 महिलांची रक्तगट तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंदिर चांदेराई च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पार पडली.याकामी प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई व पावस चे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तातडीच्या मदतीसाठी चांदेराई ची ऍम्ब्युलन्स उपलब्ध होती.