लातूर :-गणेशोत्सवाचा सोहळा दुपारी तीन वाजल्यापासून मोठ्या उत्साहात सुरू झाला असून लातूर शहरात गणरायाच्या विसर्जनासाठी तरुणाई उत्साहात रस्त्यावर उतरली. प्रकाश नगरमधील काका गणेश मंडळा सह लातूर शहरातील विविध मंडळाने डॉल्बीमुक्त मिरवणूक काढत पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरासह भव्य अशा मिरवणुका काढण्यात आल्या असून लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक गंजगोलाई सुभाष चौक या ठिकाणी शहरातील विविध गणेश मंडळे येऊन आपले सादरीकरण करत आहेत.