भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील येथील आदर्श नगरातील सुभाष आगाशे यांच्या घराच्या टावरवर वीज पडली. ही घटना 28 ऑगस्ट रोजी दुपारी साडे 12 वाजताच्या सुमारास लाखनी येथील आदर्श नगर येथे घडली. घराच्या टॉवरवर वीज पडल्याने टावरचे नुकसान झाले आहे. आज दुपारी 12 वाजेपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसासोबतच विजांचा कडकडाट सुरू होतं. सुभाष आगाशे यांच्या घरावर वीज पडल्याने टॉवरचे नुकसान झाले तसेच त्यांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्यात.