लातूर उद्योग व्यवसायात केवळ शिक्षण घेऊन चालत नाही तर शिक्षणाबरोबरच कर्तृत्व असले पाहिजे. प्रामाणिकपणे कष्ट करण्याची जिद्द असली तर कोणत्याही उद्योग, व्यवसायात निश्चितपणे यश मिळते. किमाया ब्युटी हे स्किनकेअर नैसर्गिक उत्पादन असल्याने देशातच नव्हे तर परदेशातही किमया करू शकते, तसे झाले तर आपल्या माणसांचा अभिमान आणि स्वाभिमान यापेक्षा काय असू शकतो असे सांगून सर्व समाजात आणि समाजा समाजातील घराघरात हे उत्पादन अल्पावधीत पोहोचेल याची मला खात्री आहे असे प्रतिपादन आ. रमेशआप्पा कराड यांनी केला.