आष्टी शहरातील मुर्शदपूर येथील ओमशांती कॉलनीतील एका घरात जिन्याखाली ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली.सुदैवाने यावेळी घरी कोणी नसल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ओमशांती कॉलनी येथे राहणारे अविनाश नानासाहेब पवळ हे कुटुंबासह राहतात. आज सायंकाळी गणेश मूर्ती घेण्यासाठी पवळ कुटुंब घराला कुलूप लावून शहरात गेले. घरातील जिन्याखाली भरलेले गॅस सिलेंडर होते. या सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला.