मुक्ताईनगर मतदारसंघात मतदान चोरी झाल्याच्या आरोपांवरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केलेल्या आरोपांवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. रोहिणी खडसे फक्त ट्विटरवर 'टिव टिव' करतात, मुक्ताईनगरमध्ये मतचोरी नाही, पराभवाचे खापर फोडू नका असा टोला लगावत त्यांनी रोहिणी खडसेच्या दुबार मतदानाचा गौप्यस्फोट केला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता प्रतिक्रीया दिली आहे.