मोहाडी तालुक्यातील पांजरा येथे करडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक 23 ऑगस्ट रोजी अवैध जुगार अड्ड्यावर छापेमार कारवाई केली असता 7 आरोपी तास पत्त्यांवर जुगार खेळताना मिळून आले. त्यापैकी आरोपी संदीप बाडगे वय 34 वर्षे रा. पांजरा, वसीम पठाण वय 40 वर्षे रा. तिरोडा व परमानंद सर्वे वय 30 वर्षे रा. लावेश्वर या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर 4 आरोपी घटनास्थळावरून पोलीस आल्याची चाहूल लागतात फरार झाले. यात आरोपींच्या ताब्यातून 52 तास पत्ते मोबाईल फोन मोटरसायकल.