पुसद विधानसभा मतदारसंघातील काळी दौलतसह परिसरातील गावात गुरुवारी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला या पावसामुळे शेतीपिकांचे घरांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाला आज शुक्रवार दि.२९ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी भेट देऊन पाहणी केली. गुरुवारी दुपारी काळी दौलत सह परिसरातील कोनदरी, वाकान, पोखरी, माळवागत, पेढी, मोहदी, साई, वनोली, तुळशीनगर, बोरी, वागद, वडद या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने शेतातील पिके उध्वस्त झाले.