सरकारला वाटले तर ते कुणाही व्यक्तीला तुरुंगामध्ये टाकू शकते असा जनसुरक्षा कायदा राज्य सरकारने आणला आहे. हा कायदा लागू झाला तर सुरक्षेच्या नावाखाली सरकार कुणावरही कारवाई करू शकते. त्यामुळे जनसुरक्षा कायदा रद्द व्हायलाच हवा अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज बुधवार १० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता कणकवली येथे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे करण्यात आली.