लातूर - राज्य सरकारने मांडलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२५ला घटना विरोधी व लोकशाहीस बाधक ठरवत महाविकास आघाडीने लातूरातील गांधी चौकात दुपारी 1 वाजता जन सुरक्षा कायद्याची होळी करून जोरदार निदर्शने केली. हे विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करून हुकूमशाही मजबूत करणारे असून, जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.