शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात अडकली असून अधिकारी आणि सदस्य यांच्या संगनमताने इथं सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाऱ्यांना मा. अजितदादा यांचा वरदहस्त असल्याचं तेच सांगत असल्याने अजितदादांनीही याबाबत खुलासा करण्याची गरज आहे. याबाबत रोहित पवार यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली