सेनगाव तालुक्यातील बोरखेडी तांडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शंकर पटाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून शंकर पट बघण्यासाठी उत्साही नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बोरखेडे तांडा या ठिकाणी सदर शंकर पटाचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या बैल जोड्यांना मान्यवरांच्या हस्ते भव्य बक्षीस देखील देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आले आहे