औंढा नागनाथ तालुक्यातील रुपुर तांडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत टाकी व विहिरीचे काम पूर्ण होऊन ही ग्रामस्थांना अद्याप पाणीपुरवठा होत नसल्याने पावसाळ्यातही ग्रामस्थांसह महिलांची पाण्यासाठी पायपीट होत त्यामुळे तात्काळ जल जीवन मिशन अंतर्गत चा पाणीपुरवठा सुरू करावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 2 सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी साडेतीन वाजे दरम्यान औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे प्रभारी तहसीलदार प्रवीण ऋषी यांना निवेदन दिले आहे.