जलजीवन मिशन अंतर्गत तारदाळ - खोतवाडी गावासाठी जीवन प्राधिकरण कोल्हापूरमार्फत राबवली जात असलेली नळपाणीपुरवठा योजना मागील वर्षभरापासून रखडलेली आहे. या कामातील दिरंगाई व अनियमिततेमुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.योजनेतील ढिसाळ कारभार,दर्जाहीन काम व अपुऱ्या नियंत्रणाबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराने यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, तारदाळ येथे आमरण उपोषण छेडले होते.त्याची दखल घेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांनी पाहणी केली.