: सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त डॉ. अनिल दुधभाते नेत्रालय व रेटीना सेंटर चे उद्घाटन रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. डॉ. दुधभाते यांनी शून्यातून उभारलेले हे दहा हजार चौरस फुटांचे सुसज्ज केंद्र सर्वसामान्यांच्या नेत्रसेवेसाठी महत्त्वाचे ठरेल, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. गरिबांना परवडेल अशा दरांत सेवा, मोफत नेत्रतपासणी आणि कोट्यवधींची अमेरिकन साधने असलेले हे रुग्णालय पुणेकरांसाठी वरदान ठरेल. आगामी काळात चेन हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस डॉ. दुधभाते यांनी यावेळी व्यक्त के