राजुरा-गडचांदूर राष्ट्रीय महामार्गावर आज दि. २८ ऑगस्टला दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास कापनगावजवळ भीषण अपघात झाला. राजुराहून पाचगावकडे निघालेल्या एका ऑटोरिक्षाला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या हायवा ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून, या दुर्घटनेमुळे पाचगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.