शासनाला वारंवार निवेदन देऊन देखील आरोग्य कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने 19 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. परंतु अद्याप प्रशासनाने कुठलीही कारवाई अथवा दखल या आंदोलनाची घेतलेली नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषद समोर आंदोलनाला बसलेल्या आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी भजन गात शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.