मुलीला मारहाण का करत असल्याचा जाब विचारल्याच्या रागातून जावयाने सासऱ्यास लोखंडी सळईने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता, कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली. फिर्यादी इराप्पा अंदप्पा रेड्डी (वय ६३, रा. कुंभारी) हे दूध घेऊन सोलापूरला जात असताना मुलगी कन्याकुमारी हिने फोन करून, “माझे पती मला मारत आहेत, तुम्ही घरी या” असे सांगितले. त्यानंतर ते तातडीने मुलीच्या घरी गेले.