साईबाबाच्या बुंदी लाडू प्रसादाचा भाव चाळीस टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.पूर्वी वीस रुपयांना मिळणारे दोन लाडूचे पाकीट आता तीस रुपयांना मिळणार आहेत.या दरवाढीमुळे साई भक्तांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.साई दर्शनानंतर भाविकांना मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्याच्या हेतूने साई संस्थेने ही दरवाढ केल्याचं बोललं जात आहे.मात्र भाविकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या विश्वस्त संस्थेने असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून असा तोटा भरून काढावा का? प्रश्न भाविक करत आहेत.