मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला. २९ ऑगस्ट रोजी मुंबईला जाण्यासाठी आज रविवार 24 ऑगस्ट रोजी दुपारी परभणी जिल्ह्यातील इंद्रायणी माळावर २५ गावचे मराठा बांधव हजारोंच्या संख्येने एकवटले होते. येथे आलेल्या मराठा बांधवांनी एकजुटीचा संकल्प करून संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा ठराव घेतला. लाखोच्या संख्येने मुंबईकडे निघण्याचा संकल्प इंद्रायणी देवीला साक्षी ठेवून केला.