भडगाव शहरानजिक असलेल्या शासकीय आयटीआय जवळ भला मोठा सर्प दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तात्काळ सर्पमित्र सुशील महाजन यांना बोलवण्यात आले, सदर सदर सर्पास महाजन यांनी शीताफिने पकडत हा अजगर जातीचा सर्प असल्याचे सांगितले, पकडलेल्या अजगरास आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले असून सर्पमित्र व त्याच्या साथीदार सागर कोराडकर, मांगो थोरात, समाधान भिसे यांनी जीवनदान दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे,