सेनगांव तालुक्यात आज घरोघरी ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्येष्ठा गौरीचा सण सेनगांव तालुक्यात साजरा करण्यात येत असून अनेक वर्षांची परंपरा परंपरा कायम ठेवत घरोघरी ज्येष्ठ गौरी साकारण्यात आल्या आहेत. तसेच उद्या ज्येष्ठा गौरीचे पूजन व महाआरती करण्यात येणार असून दिनांक 2 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरीचे विसर्जन करण्यात येणार आहे. सेनगांव तालुक्यातील आजेगांव सह विविध गावात घरोघरी आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास ज्येष्ठा गौरी साकारण्यात आल्या.