महाराष्ट्र राज्य क्रिडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती येथील तालुका क्रिडा संकुलनात पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात करीत जिल्हास्तरावर प्रवेश केला आहे. सदर संघ हा चंद्रपूर येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.