नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सावळघाटात एका ऊसाची वाहतूक करणारा ट्रक फसला तर दोन ठिकाणी खड्डयात आदळल्याने दोन कंटेनर रस्त्यातच अडकून पडल्याने गुरुवारी सकाळ पासून या घाटामध्ये वाहतूकीची कोंडी झाली आहे. पोलीस निरीक्षक व्दारकानाथ गोंदके यांनी पोलीस पथकासह घाटात वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्याने सायंकाळ पर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.