पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल मिसिंग मधील हरवलेल्या इसमांचा शोध घेणेबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी यांना आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने गणेश भारसावडे यांनी दि १७/०५/२०१९ रोजी सकाळी पोलीस स्टेशन विमानतळ येथे येऊन मिसिंग तक्रार दिली होती. सदर मिसिंगची चौकशी कसोशीने करीत असताना पोलीस स्टेशन विमानतळ पोलीस पथक यांनी गुप्त बातमीदार, सायबर सेल यांचे मदतीने पनवेल नवी मुंबई येथुन नवनाथ भारसावडे यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन विमानतळला आणुन उपरोक्त भेट घडवू आणली आहे.