स्मिता पाटील विद्यालयात गणरायाचे स्वागत नाचत नाही तर वाचत करूया " या अनोख्या उपक्रमातून विद्येची देवता गणेशाचे स्वागत करण्यात आले. नवभारत ज्ञानवर्धिनी संस्थेचे संस्थापक प्रा. एस. आर. पाटील यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्षा संजीवनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष तनपुरे व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक के. जी. पाटील यांच्या नियंत्रणाखाली हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.