केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी सुनगाव व निंभोरा येथे सांत्वनपर भेट दिली. सुनगाव येथील शिवसेना तालुका उपप्रमुख संजय धुळे यांच्या मातोश्रीचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते, तसेच निंभोरा येथे राजू देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाप्रमुख शांताराम दाने ,देविदास घोपे ,अजय पारस्कर, संजय भुजबळ, अनंता बकाल, बाळू पाटील इत्यादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.