जिल्हा परिषदेच्या “आपल्या दारी” या जनकल्याणकारी उपक्रमांतर्गत पाचोरा येथे आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता तक्रार निवारण सभेचे आयोजन व्यापारी भवन येथे करण्यात आले होते, या सभेला आमदार किशोर आप्पा पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.