अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहीगाव रेचा येथील जय भोले कावड मंडळाच्या वतीने आज सकाळी ११:३० वाजता लाखपूरी ते दहीगाव रेचा पर्यंत भव्य कावड यात्रा काढण्यात आली. जय भोले कावड मंडळाचे पदाधिकारी यांनी लाखपूरी येथील चंद्रभागा नदीचे जल आणून आज पोळा निमित्त बैलांच्या शिंगावर व दहिगाव रेचा येथील महादेव संस्थान येथील शिव पिंडीवर टाकण्यात आले. मोठ्या थाटामाटात व वाजत गाजत ही कावड लाखपूरी येथून दहीगाव पर्यंत ४५ किलो मिटर अंतर कापत पायी काढण्यात आली.