वसमतच्या छ.शिवाजी पुवळा येथुन SDM कार्यालयापर्यंत आज दि 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 रोजी शहरात आज महाविकास आघाडी कडून राज्य सरकारच्या विरोधात निदर्शन करण्यात आलं. जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा शिवसेना यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं.