भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरात 20 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वा. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली असता भंडारा शहरातील अश्रफी नगर तकिया वार्ड येथील अल्ताफ इस्माईल शेख वय 40 वर्षे याने दुकानात ठेवलेले महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखू एकूण किंमत 10 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.