दुचाकी चालक महिलेचा खड्डयांमुळे अपघात झालेची घटना CCTV कॅमेरात कैद झाली आहे.नाशिक शहरात मुख्य रस्त्यांवर मोठ-मोठी खड्डे पडले असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार सर्वच पक्षाने महापालिकेला निवेदन दिले तसेच आंदोलनही करण्यात आले, परंतु कुठलीही उपाययोजना होत नसल्याने अनेक जणांना आपला जीव गमावावा लागला आहे.अशीच एक घटना मायको सर्कल ते आरडी सर्कलला जोडणाऱ्या मार्गावर घडली आहे.सदर घटनेचे CCTV कॅमेरात कैद झाली आहे.