मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे शेतातील गवत काढण्याच्या वादातून चुलत भावाच्या मुलींनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. बलभीम रंगनाथ माळी (वय 60, रा. शेटफळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 31 ऑगस्ट रोजी दुपारी ते शेतातून गवत घेऊन घरी आले असता चुलत भाऊ शिवाजी माळी यांच्या मुली उमा व आशा यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली. दरम्यान उमा हिने हातातील दगड डोक्यात मारला. यामुळे बलभीम माळी जखमी झाले असून त्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.