तालुक्यातील सावळदे गावातील तापी नदी पुलावर 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साडे 3 वाजेच्या सुमारास गणेश विसर्जनावेळी घडलेली एक धक्कादायक घटना स्थानिक बचाव पथकाच्या तत्पर कार्यवाहीमुळे सुखरूप पार पडली.गणेश विसर्जना दरम्यान तोल जाऊन नदी पात्रात कोसळलेल्या युवकाला बचाव पथकाने योग्य वेळी पाण्याबाहेर काढत जीव वाचवला. या प्रसंगावधाना बद्दल धुळे जिल्हाधिकारी यांनी उपसरपंच सचिन राजपूत व त्यांच्या पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले.