चार दिवसाच्या मुसळधार पावसामुळे तब्बल १०५ प्रकल्प ओव्हर फ्लो...वाशिम जिल्ह्यात गत चार दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यात कमालिची वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण 167 लघु आणि मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल १०५ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यामध्ये पाटबंधारे विभागाचे ३७ तर मृद व जलसंधारण विभागाच्या ६८ प्रकल्पांचा समावेश आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अनेक ठिकाणी शेती सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.