बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहरातील जिजाऊ राजवाडा समोर जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी अतिश तायडे, डॉ. प्रवीण तायडे, उमेश खरात सागर मेहेत्रे यांच्यासह ओबीसी बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.1 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी भेट दिली. यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.