गळफास घेऊन एका 22 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जुना धामणगाव येथे घडली आहे .शेख आशिया मजहर शेख असे मृतक महिलेचे नाव आहे .तिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली .घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले .घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. आत्महत्या चे कारण अद्याप कळले नसून घटनेचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहे.