माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, प्रातांध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सोलापूरचे निरीक्षक मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी 11 वाजता अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीची बैठक अध्यापक विद्यालय अक्कलकोट येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सातलिंग शटगार यांनी निवड झाल्याबद्दल अक्कलकोट तालुका काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी सत्कार केला.