भंडारा जिल्ह्यातील मौजा मुंडीपार सडक येथे दिनांक 10 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता दरम्यान आरोपी ट्रक क्रमांक डब्ल्यू बी 23 ए 7172 च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक लापरवाहीने व हईगईने चालवून सत्येंद्र तिवारी वय 35 वर्षे रा. मेद्रा राज्य मध्यप्रदेश यांच्या ट्रक क्रमांक सीजी 04 एचबी 8124 ला डाव्या बाजूने धडक दिली. त्यामुळे सत्येंद्र यांच्या ट्रकचे नुकसान झाले. तर आरोपी ट्रकचालक हा स्वतः जखमी झाला. या प्रकरणी फिर्यादी सत्येंद्र तिवारी यांच्या तोंडी रिपोर्टरून पोलीस स्टेशन लाखनी येथे...