सेनगांव तालुक्यातील आजेगांव या ठिकाणी चोरट्याने धाडसी चोरी करून रोख रक्कम लंपास केल्याने या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अाजेगांव येथील रहिवासी असलेली वृद्ध महिला जायेदाबी अफसर खा पठाण यांच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देऊन 30 हजार हजाराची रोख रक्कम लंपास केली. जायेदाबी अफसर खा पठाण या वृद्ध महिलेने जमा करून ठेवलेल्या माया पुंगीवर चोरट्याने डल्ला मारल्याने महिलेस अश्रू अनावर झाले.